ठळक मुद्देरताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात चहलला संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याचा पहिला चेंडू धक्का देणारा ठरला.
चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात चहलला संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याचा पहिला चेंडू धक्का देणारा ठरला.
वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी झोकात सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकांमध्ये एकही बळी न गमावता वेस्ट इंडिजने 51 धावा पूर्ण केल्या होत्या. यावेळी भारताला पहिल्या बळीची गरज होती.
सातव्या षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माने चहलच्या हातात चेंडू सुपूर्द केला. चहलने आपल्या पहिल्याच चेंडूवर शाई होपला बाद केले आणि वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला. होपचा झेल यावेळी संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने पकडला.