चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-20 सामना चेन्नमध्ये रंगत आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या एका गोलंदाजाने एकही चौकार दिला नव्हता, पण या सामन्यात मात्र त्याला पहिला चौकार बसला.
भारताकडून एवढा भेदक मारा करणारा गोलंदाज नेमका आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने भेदक मारा करत फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य करताना त्याने संघाला लवकर यश मिळवून दिले होते.
तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातही त्याने भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य केले. पण या सामन्यात मात्र त्याला पहिला चौकार बसला. हा गोलंदाज म्हणजे युवा खलील अहमद. तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात त्याला वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने चौकार लगावला. या मालिकेत खलीलला उजव्या हाताच्या फलंदाजाने लगावलेला हा पहिला चौकार ठरला.