ठळक मुद्देअखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने विजय मिळवला.अखेरच्या चेंडूवर नशिब बलवत्तर म्हणून भारताला एक धाव मिळाली आणि त्यांनी सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली आहे.
चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-20 रोमहर्षक लढतीत अखेर भारताने विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने 92, तर 58 धावा केल्या. त्यामुळे भारत हा सामना सहजपणे जिंकेल असे वाटत होते. पण या दोघांनीही आपल्या विकेट बहाल केल्या आणि सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला. अखेरच्या चेंडूवर नशिब बलवत्तर म्हणून भारताला एक धाव मिळाली आणि त्यांनी सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली आहे.