Join us  

IND vs WI 3rd T20I Live Updates : पराभवातून शिकणार, भारतीय संघ आज दोन बदलांसह मैदानावर उतरणार?; बघा प्लेइंग इलेव्हन कशी असणार

IND vs WI 3rd T20I Live Updates : India Playing XI - भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजकडून हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 6:13 PM

Open in App

IND vs WI 3rd T20I Live Updates : India Playing XI - भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजकडून हार मानावी लागली. फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला हा पराभव पत्करावा लागला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आली. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १६ तासांत दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळावा लागत असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला आधीच बरीच विश्रांती दिली गेली आहे, त्यामुळे तो आज खेळणार. 

दोन्ही सामन्या रोहित व सूर्यकुमार यादव यांनी ओपनिंग केली, परंतु सूर्याला फार चमक दाखवता आली नाही. त्यामुळे आज इशान किशन व रोहित ही जोडी ओपनिंगला दिसू शकले. संजू सॅमसन हाही ओपनरच्या शर्यतीत आहे. आयर्लंडविरुद्ध त्याने ७७ धावांची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी केली होती. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, रिषभ पंत व हार्दिक पांड्या आहेतच. पण, अय्यरच्या जागी दिपक हुडाला रिप्लेस केले जाऊ शकते.  

cr

भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या ट्वेंटी-२०त केवळ दोन षटकं फेकली होती. त्याला दुखापत नसूनही रोहितने दोनच षटकं का दिली याचे उत्तर सामन्यानंतर मिळाले. डेथ ओव्हरमध्ये रोहितला युवा खेळाडूंना संधी द्यायची होती आणि त्यांना तो अनुभव मिळावा यासाठी अर्शदीप व आवेश यांनी १९ व २०वे षटक फेकले होते. हर्षल पटेल दुखापतीमुळे आजच्या सामन्यातही खेळणार नाही.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App