India vs West Indies 3rd T20I Live Updates : दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. पण रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाईल, याचा अंदाज कुणी बांधला नव्हता. भारतीय संघात जडेजाच्या जागी आज दिपक हुडाला संधी देण्यात आली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. किंग्सने २० चेंडूंत २० धावा करताना तीन चौकार खेचले आणि हार्दिक पांड्याने त्याची विकेट मिळवून दिली. हार्दिकची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही पन्नासावी विकेट ठरली. वेस्ट इंडिजला ५७ धावांवर पहिला धक्का बसला. हार्दिकने या विकेटसह ऐतिहासिक कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५००+ धावा अन् ५० विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहिद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे