IND vs WI, 3rd T20I Live Updates : Shardul Thakur ठरला गेम चेंजर!; वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इंग्लंडला दिला धक्का

IND vs WI, 3rd T20I Live Updates :  सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 10:48 PM2022-02-20T22:48:50+5:302022-02-20T22:52:00+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 3rd T20I Live Updates : India beat west Indies by 17 runs, India becomes the number 1 ranked team in T20I in ICC ranking | IND vs WI, 3rd T20I Live Updates : Shardul Thakur ठरला गेम चेंजर!; वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इंग्लंडला दिला धक्का

IND vs WI, 3rd T20I Live Updates : Shardul Thakur ठरला गेम चेंजर!; वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत टीम इंडियाने इंग्लंडला दिला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या तीन षटकांत माघारी परतले. पण, त्यानंतर विंडीजने संघर्ष दाखवताना सामन्यातील आव्हान कायम राखले होते. निकोलस पूरन, रोवमन पॉवेल यांनी पुन्हा एकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) मोक्याच्या क्षणाला निकोलसची विकेट घेत सामना फिरवला अन् वेस्ट इंडिजचा आणखी एक पराभव झाला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने पाचव्या चेंडूवर कायल मेयर्सला ( ६) बाद केले. मैदानावरील अम्पायरने कॅचची अपील नाकारल्यानंतर रोहितने त्वरित DRS घेतला आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर पुढच्या षटकातच चहरने विंडीजचा दुसरा सलामीवीर शे होप्स ( ८) याचीही विकेट घेतली. भारतीय संघाने पुनरागमन केलेले असताना प्रमुख गोलंदाज दीपक चहर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.  निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर ( १४ चेंडू) चालते केले. किरॉन पोलार्ड या मालिकेतच अपयशी ठरला आणि आजही तो केवळ ५ धावांवर बाद झाला. जेसन होल्डरही ( २) लगेच बाद झाला आणि पोलार्ड व होल्डर यांची विकेट वेंकटेश अय्यरने घेतली. 


अय्यरच्या धक्क्यानंतर हर्षल पटेलने आयपीएलमधील अनुभव कामी आणला आणि रोस्टन चेसला स्लोव्हर यॉर्करवर त्रिफळाचीत केले. विंडीजची अवस्था ६ बाद १०० अशी झाली होती. निकोलस ३७ धावांवर असताना रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक इशान किशनने झेल सोडला. पूरन व रोमारियो शेफर्ड ही जोडी फटकेबाजी करताना दिसली. पूरनने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक पूर्ण करताना विंडीजच्या विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता. चहरसारखा अनुभवी गोलंदाज मैदानाबाहेर गेल्याचा भारताला फटका बसताना दिसला. पदार्पणवीर आवेश खानच्या ४ षटकांत ४२ धावा आल्या.

१८ चेंडूंत विजयासाठी ३७ धावांची गरज असताना शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणण्याचा रोहितचा प्लान यशस्वी ठरला. शार्दूलनच्या संथ गतीने टाकलेल्या चेंडूवर निकोलस फसला अन् इशान किशनने अफलातून झेल टिपला. निकोलस ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावांवर माघारी परतला. शार्दूलने १८व्या षटकात ६ धावा देताना महत्त्वाची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. हर्षलने १९व्या षटकात शेफर्डला २९ धावांवर बाद करून भारताचा विजय पक्का केला. हर्षलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावाच करता आल्या. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका ३-० अशी खिशात घालताना ICC T20I Ranking मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

तत्पूर्वी,  ऋतुराज गायकवाडला ( ४) आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित ७ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर  या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. 


 

 

Web Title: IND vs WI, 3rd T20I Live Updates : India beat west Indies by 17 runs, India becomes the number 1 ranked team in T20I in ICC ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.