IND vs WI, 3rd T20I Live Updates : भारत-वेस्ट इंडिज तिसरा सामना होऊ शकतो रद्द; समोर आलं महत्त्वाचं कारण

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:47 PM2022-02-20T17:47:08+5:302022-02-20T17:47:34+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI, 3rd T20I Live Updates : It's raining in Eden Gardens right now, and the prediction of rain is upto 8 pm tonight. | IND vs WI, 3rd T20I Live Updates : भारत-वेस्ट इंडिज तिसरा सामना होऊ शकतो रद्द; समोर आलं महत्त्वाचं कारण

IND vs WI, 3rd T20I Live Updates : भारत-वेस्ट इंडिज तिसरा सामना होऊ शकतो रद्द; समोर आलं महत्त्वाचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व शेवटचा ट्वेंटी-२० सामना आज ईडन गार्डनवर होणार आहे. पण, आता हा सामना होणार की नाही, यावरच संभ्रम निर्माण झाले आहे. बीसीसीआयने काही मिनिटांपूर्वी एक फोटो पोस्ट केला आहे आणि तो पाहून हा सामना होण्याची शक्यता फार कमीच दिसत आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकून विजयी आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी बायो बबल सोडून १० दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहेत. रोहित शर्मा व ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात सलामीला येण्याची शक्यता आहे. ऋतुराजला मागील दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती. त्याच्या जागी इशान किशन सलामीला खेळला, परंतु आजच्या सामन्यात किशन मधल्याफळीत खेळण्याची शक्यता आहे. विराटच्या जागी संघात श्रेयस अय्यरचे पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद सिराजची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

त्यात आता कोलकाता येथे पाऊस पडत असल्याने संपूर्ण मैदाना कव्हर केले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे. 

Web Title: IND vs WI, 3rd T20I Live Updates : It's raining in Eden Gardens right now, and the prediction of rain is upto 8 pm tonight.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.