Join us  

IND vs WI 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 7:14 AM

Open in App

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २० षटकांत ५ अर्धशतकं व १ शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याने  ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचून ७६ धावा चोपल्या. त्याने अल्झारी जोसेफला मारलेला नाद खुळा शॉट सर्वांचे लक्ष वेधून गेला. भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. 

कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स ( २०) या सलामीवीरांनी ५७ धावांची भागीदारी केली. कायले मेयर्स ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करून बाद झाला. शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. २०व्या षटकात अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या. 

वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तरात रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. पण, ५ चेंडूंत ११ धावा करून तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. श्रेयस २४ धावांवर, तर सूर्यकुमार ७६ धावांवर बाद झाला. भारताला ३२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि हातात ७ विकेट्स होत्या. रिषभ पंत सुसाट सुटला होता आणि त्याने चौकार-षटकार मारायला सुरुवात केली. हार्दिक पांड्या ४ धावांवर माघारी परतला. रिषभने २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३३ धावा केल्या, दीपक हुडाने नाबाद १० धाव केल्या. भारताने १९ षटकांत ३ बाद १६५ धावा करून सामना जिंकला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादव
Open in App