India vs West Indies 3rd T20I Live Updates : वेस्ट इंडिजच्या १६४ धावांना प्रत्युत्तर देताना रोहित शर्माने ( Rohit Sharma) चांगली सुरुवात करून दिली. मागील सामन्यात गोल्डन डकवर बाद झालेल्या रोहितने पहिल्याच चेंडूवर धाव घेतली. दुसऱ्या षटकात अल्झारी जोसेफला त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, तर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पण, पुढच्याच चेंडूवर बाद न होताच रोहितने मैदान सोडण्याच निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय भारताची धाकधुक वाढवणारा ठरला. त्याला नेमकं काय झालं हे अद्याप कळलं नसलं तरी त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहित ५ चेंडूंत ११ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.
कायले मेयर्सच्या दमदार फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हैराण करून सोडले. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचे दिलेले आव्हान वेस्ट इंडिजने स्वीकारले. कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स ( २०) या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला आणि ५७ धावांची भागीदारी केली. हार्दिक पाड्याने पहिली विकेट घेतली व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५००+ धावा अन् ५० विकेट्स घेणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. मेयर्सने आर अश्विनचा चेंडू षटकार खेचून मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पांड्या व आर अश्विन चांगली गोलंदाजी करताना दिसले, परंतु आवेश खानला मेयर्सने टार्गेट केले. आवेशच्या तीन षटकांत विंडीजने ४७ धावा कुटल्या.
मीभुवीने आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा करणाऱ्या मेयर्सला त्याने बाद केले. शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. २०व्या षटकात अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणाऱ्या रोव्हमन पॉवेलला तिसऱ्या चेंडूवर बाद केले. पॉवेलने १४ चेंडूंत २३ धावा केल्या. हेटमायरही १२ चेंडूंत २० धावा करून धावबाद झाला. विंडीजने ५ बाद १६४ धावा केल्या.
Web Title: IND vs WI 3rd T20I Live Updates : Rohit Sharma has left the ground due to a possible hamstring issue, Shreyas Iyer comes to bat.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.