India vs West Indies, 3rd T20I Live Updates : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या तीन षटकांत माघारी परतले. पण, त्याहीनंतर विंडीजने संघर्ष दाखवताना सामन्यातील आव्हान कायम राखले आहे. निकोलस पूरन, रोवमन पॉवेल यांनी पुन्हा एकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) च्या तावडीतून ते सुटले नाही. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पॉवेल उडवलेला चेंडू शार्दूलने उलटी धाव घेत अप्रतिमरित्या टिपला.
वेस्ट इंडिजला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने पाचव्या चेंडूवर कायल मेयर्सला ( ६) बाद केले. मैदानावरील अम्पायरने कॅचची अपील नाकारल्यानंतर रोहितने त्वरित DRS घेतला आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर पुढच्या षटकातच चहरने विंडीजचा दुसरा सलामीवीर शे होप्स ( ८) याचीही विकेट घेतली. भारतीय संघाने पुनरागमन केलेले असताना प्रमुख गोलंदाज दीपक चहर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याने केवळ १.५ षटक फेकले.
निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर ( १४ चेंडू) चालते केले. किरॉन पोलार्ड या मालिकेतच अपयशी ठरला आणि आजही तो केवळ ५ धावांवर बाद झाला. जेसन होल्डरही ( २) लगेच बाद झाला आणि पोलार्ड व होल्डर यांची विकेट वेंकटेश अय्यरने घेतली. ( First Pollard and then the wicket of Jason Holder, Venkatesh Iyer picks up two key wickets.)
तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित ७ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
Web Title: IND vs WI, 3rd T20I Live Updates : Shardul Thakur's superb running catch, it went really high and he judged it perfectly, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.