India vs West Indies, 3rd T20I Live Updates : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने करिष्मा केला. ३ बाद ६६ अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियासाठी तो संकटमोचक म्हणून धावला अन् वेंकटेश अय्यरसह विंडीजच्या गोलंदाजांना चोपून काढला. त्याने आज अनेक विक्रमही मोडले.
फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले रोहित शर्माचे बदल आज फसले. ऋतुराज गायकवाडला आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. फॅबियन अॅलनच्या गुगलीला अय्यर फसला अन् होल्डरच्या हाती झेल देऊन २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित ७ धावांवर बाद झाला.
मात्र, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) या जोडीने चांगली फटकेबाजी केली. त्यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्या विंडीजसमोर तगडे आव्हान उभे केले. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.
तुम्हाला हे माहित्येय का?सूर्यकुमार यादवने आतापर्यंत खेळलेल्या चारही द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिकेत किमान एक ५०+ खेळी केली आहे. त्याने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५७, श्रीलंकेविरुद्ध ५०, न्यूझीलंडविरुद्ध ६२ आणि आज वेस्ट इंडिजविरुद्ध ६५ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या १२ डावांत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांत सूर्यकुमारने ३५१ धावांसह अजिंक्य रहाणेला ( २६९) मागे टाकले. लोकेश राहुल ( ४७६), विराट कोहली ( ३८३) , गौतम गंभीर ( ३७८) व युवराज सिंग ( ३५१) हे आघाडीवर आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पाचव्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी आज सूर्यकुमार व वेंकटेश यांनी ( ९१ धावा) नोंदवली. २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंग यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२* आणि २०१८मध्ये धोनी व मनीष पांडे यांनी दक्षिण आफ्रिकेविरुरद्ध ९८* धावांची भागीदारी केली होती.
पाहा व्हिडीओ...