India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) च्या वादळी खेळीला तिलक वर्माने संयमी साथ देत भारताचा विजय पक्का केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळून मालिकेत १-२ असे कमबॅक केले. या विजयामुळे भारताचे मालिकेतील आव्हान कायम राखले आहे. सूर्याने २ बाद ३४ वरून डाव सावरला अन् तिलकसह ५१ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. सूर्याचे शतक थोडक्यात हुकले.
१४ चेंडूंत ६४ धावा! सूर्यकुमार यादवचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने बाबर आजमला झुकवले
यशस्वी जैस्वाल ( १) व शुबमन गिल ( ४) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून इरादे स्पष्ट केले. तिलक संयमी खेळ करताना दिसला. सूर्यकुमारने २३ चेंडूंत त्याचे १४ वे अर्धशतक पूर्ण केले. वरूणराजा गरजत असताना सूर्या मैदानावर चांगली फटकेबाजी करत होता. सूर्यकुमार आज शतक झळकावेल असे वाटत असताना अल्झारी जोसेफने ही विकेट मिळवली. सूर्या ४४ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा करणाऱ्या फलंदाजांत सूर्याने शिखर धवनला मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे.
तत्पूर्वी, कुलदीप यादवने ( ३-२४) आज वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना बाद करून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद ५०+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले, तर भारताकडून ट्वेंटी-२०त ५०+ विकेट्स घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला. कुलदीपने एकाच षटकात विंडीजच्या निकोलस पूरन ( २०) आणि ब्रेंडन किंग ( ४२) या दोन सेट फलंदाजांना माघारी पाठवले. पण, रोव्हमन पॉवेलने १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या आणि संघाला ५ बाद १५९ धावांपर्यंत पोहोचवले.