India vs West Indies 3rd T20I Live Updates : वेस्ट इंडिजने २०१६ नंतर भारताला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आणि आज त्यांच्याकडे मालिका विजयाची संधी आहे. भारताने आजच्या सामन्यात इशान किशन व रवी बिश्नोई यांच्याजागी यशस्वी जैस्वाल व कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सर्व खेळाडू मैदानावर येऊनही सामना सुरू होण्यास विलंब झाला अन् त्यामागचं कारण फार विचित्र होतं... भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने त्यावरून चिमटा काढला.
कसोटी मालिकेत दमदार पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालला आज ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी दिली गेली आहे. कसोटी मालिकेत त्याने १७१ धावांच्या वैयक्तिक खेळीसह ३ इनिंग्जमध्ये २६६ धावा केल्या होत्या आणि अनेक विक्रम मोडले होते. आयपीएल २०२३ मध्ये यशस्वीने आक्रमक फटकेबाजीने तगड्या प्रतिस्पर्धींना हतबल केले आणि आज तो सलामीला आला. भारताकडून ट्वेंटी-२०त सलामीला येणारा यशस्वी ( २१ वर्ष व २२३ दिवस) हा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये पृथ्वी शॉने ( २१ वर्ष व २५८ दिवस) श्रीलंकेविरुद्ध या मान पटकावला होता. विंडीजने आजच्या सामन्यात जेसन होल्डरशिवाय खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात जेसनच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळे व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
खेळाडू मैदानावर आल्यावर त्यांना दिसले की ३० यार्ड सर्कलच आखला गेला नाही आणि त्यामुळे ग्राऊंड्समनची पळापळ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे सामन्याला विलंब झाला. यावरून आर अश्विननेह ट्विट केले. त्याने लिहिले की, अशी कारण असणाऱ्या दौऱ्यावर जाणे सोपी गोष्ट नाही. क्रिकेटपटू वेळेत खेळपट्टीवर येतात आणि त्यांना नेहमीच अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतो.
Web Title: IND vs WI 3rd T20I Marathi Live : Unique delay, Players are walking out of the ground as the 30-yard circle has not been marked yet, R Ashwin's tweet goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.