मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी 71 धावांची सलामी दिली. या भागीदारीसह भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी ही चौथी सलामीची जोडी ठरली आहे. 12व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर किमो पॉलने धवनला बाद केले. त्यानंतर पॉलने असे काही केले, ते पाहून धवनलाही हसू आवरले नाही. तंबूत परत जाताना तो हसत हसत गेला.रोहित आणि धवन ही जोडी तोडण्यासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने चेंडू किमो पॉलच्या हातात दिला. पॉलचे पहिलाच चेंडू बाउन्सर टाकला, परंतु भारताला चार अतिरिक्त धावा मिळाल्या. दुसऱ्याच चेंडूवर धवनने आणखी एक चौकार लगावला. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. पाचव्या चेंडूवर पुल मारण्याच्या नादात धवनने टोलावलेला चेंडू कायरेन पॉवेलच्या हातात विसावला आणि धवनला माघारी फिरावे लागले.
त्यानंतर पॉलने सुरुवातीला विंडीज शैलीत सेलिब्रेशन केले, परंतु धवन नजीक येताच त्याने मांडीवर हात थोपटून नंतर तो वर हवेत केला. एरवी या शैलीने धवन इतरांना डिवचायचा, परंतु आज तो स्वतःच्याच जाळ्यात अडकला. पॉलच्या या शैलीमुळे विंडीज खेळाडूंनाही हसू आवरले नाही.
पाहा हा व्हिडीओ...