Join us  

IND vs WI, 4th T20I Live Update : रोहित शर्माची वादळी खेळी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम; शाहिद आफ्रिदीला टाकले मागे

India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 9:30 PM

Open in App

India vs West Indies, 4th T20I Live Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.४ षटकांत फलकावर ५३ धावा चढवल्या. रोहित व सूर्या यांनी वेस्ट इंडिजचा गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या एका षटकात २५ धावा चोपल्या. अकिल होसैनने ही भागीदारी संपुष्टात आली. रोहित १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३३ धावांवर बाद झाला. पण, त्याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. 

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांपुढे अखेरचे दोन सामने खेळले जाणार आहेत आणि रोहित शर्माने ( Rohit Sharma) खणखणीत षटकेबाजी करून प्रेक्षकांची दाद मिळवली.  वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवी बिश्नोई, अक्षर पटेल व संजू सॅमसन हे आज प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळणार आहेत, तर हार्दिक पांड्या, आर अश्विन व श्रेयस अय्यर यांना विश्रांती दिली गेली आहे. पण, भारताला एक मोठा धक्का बसला आहे. 

रोहितने ३३ धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडुलकर ( 34357 ) स राहुल द्रविड ( 24064) , विराट कोहली ( 23726 ), सौरव गांगुली ( 18433 ), महेंद्रसिंग धोनी ( 17092) व वीरेंद्र सेहवाग ( 16892) यांच्यानंतर रोहितने हा टप्पा ओलांडला. त्याने आज तीन षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले. ख्रिस गेल ५३३ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितने आज ४७७ वा षटकार खेचून पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माशाहिद अफ्रिदी
Open in App