India vs West Indies, 4th T20I Live Update : भारतीय फलंदाजांनी आज सुरेख फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना त्यांनी १९२ धावांचे लक्ष्य उभे केले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व संजू सॅमसन यांच्यानंतर अक्षर पटेलनेही हात साफ केले.
रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सूर्यकुमार यादव यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ४.४ षटकांत फलकावर ५३ धावा चढवल्या. रोहित व सूर्या यांनी वेस्ट इंडिजचा गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या एका षटकात २५ धावा चोपल्या. अकिल होसैनने ही भागीदारी संपुष्टात आली. रोहित १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार खेचून ३३ धावांवर बाद झाला. पण, त्याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. रोहितने ३३ धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडुलकर ( 34357 ) स राहुल द्रविड ( 24064) , विराट कोहली ( 23726 ), सौरव गांगुली ( 18433 ), महेंद्रसिंग धोनी ( 17092) व वीरेंद्र सेहवाग ( 16892) यांच्यानंतर रोहितने हा टप्पा ओलांडला. त्याने आज तीन षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात दुसरे स्थान पटकावले. ख्रिस गेल ५३३ षटकारांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितने आज ४७७ वा षटकार खेचून पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला.
सूर्यकुमार २४ धावांवर माघारी परतला. दीपक हुडा व रिषभ पंत यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ४७ धावांची भागीदारी केली. अल्झारी जोसेफने भारताला दुसरा धक्का देताना हुडाला २१ धावांवर माघारी पाठवले. पंत सुसाट खेळला, त्याने ३१ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसनने नाबाद ३० धावा केल्या. अक्षर पटेलने ८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून नाबाद २० धावा करताना भारताला ५ बाद १९१ धावांचा टप्पा गाठून दिला.
Web Title: IND vs WI, 4th T20I Live Update : Terrific finishing by Axar Patel, 20* from just 8 balls helped India to post 191 for 5 - Pant 44(31), Rohit 33(16) & Samson 30*(23) did their job really well.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.