India vs West Indies, 4th T20I Live Update : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांपुढे अखेरचे दोन सामने खेळले जाणार असून, या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर कसा खेळतो, याकडेही लक्ष असेल. वर्ल्ड कप संघात श्रेयसला स्थान मिळणे कठीण होत चालले आहे. दीपक हुडाने मात्र संधीचा पुरेपूर लाभ घेतला. त्यामुळे मधल्या फळीत श्रेयसला स्थान मिळेलच याची खात्री नाही. दरम्यान, खराब वातावरणामुळे नाणेफेकीला विलंब झाला आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोर्चबांधणीच्या दृष्टीने या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आशिया चषक संघात लोकेश राहुल आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होईल, त्यावेळी श्रेयसला बाहेर बसावे लागू शकते. त्याने तीन सामन्यात शून्य, ११ आणि २४ धावा केल्या. वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंपुढे तो डळमळतो. राहुल द्रविड यांनी कोचपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सर्वच खेळाडूंना पुरेशी संधी दिली जात आहे, मात्र श्रेयस हा वनडेच्या तुलनेत टी-२० त अपयशी ठरला.
द्रविड यांनी मागच्या अडीच महिन्यात श्रेयसला नऊ टी-२० सामने खेळण्याची संधी दिली. त्याला सुरुवातीच्या दहा षटकात खेळण्याची संधीही मिळाली, तरी तो एकही अर्धशतक ठोकू शकला नव्हता. श्रेयसला अखेरच्या दोन सामन्यात संधी मिळाली तर मोठी खेळी करण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नसावा. दरम्यान, आजचा सामना ८.४५ ला सुरू होणार असून ८.१५ वाजता नाणेफेक होणार आहे.
Web Title: IND vs WI, 4th T20I Live Update : The toss has been delayed due to bad weather, Toss at 8:15 PM IST. Game starts at 8:45 PM
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.