India vs West Indies, 4th T20I Live Update : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांपुढे अखेरचे दोन सामने खेळले जाणार आहेत आणि रोहित शर्माने ( Rohit Sharma) खणखणीत षटकेबाजी करून प्रेक्षकांची दाद मिळवली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोर्चबांधणीच्या दृष्टीने या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवी बिश्नोई, अक्षर पटेल व संजू सॅमसन हे आज प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळणार आहेत, तर हार्दिक पांड्या, आर अश्विन व श्रेयस अय्यर यांना विश्रांती दिली गेली आहे. पण, भारताला एक मोठा धक्का बसला आहे.
भारताचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेल ( Harshal Patel) याने दुखापतीमुळे विंडीजविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून माघार घेतली आहे. तो आशिया चषक स्पर्धेलाही मुकणार आहे. BCCI आशिया चषक स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर करणार आहे. तत्पूर्वी, भारताला हा मोठा धक्का बसला आहे. हर्षल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे अपडेट्स बीसीसीआयने दिले. या दुखापतीमुळेच तो दुसऱ्या व तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात खेळला नव्हता आणि आज चौथ्या सामन्यात BCCI ने त्याने मालिकतून माघार घेतल्याचे जाहीर केले.
आता तो आशिया चषक स्पर्धेतही खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. अमेरिकेतून मायदेशात परतल्यानंतर हर्षल बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल. हर्षलने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताकडून पदार्पण केले होते आणि १७ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.
cr
Web Title: IND vs WI, 4th T20I Live Update : UPDATE: Harshal Patel has not fully recovered from his rib injury and is ruled out of the remaining two T20Is against West Indies, set to miss Asia Cup 2022, doubtful for ICC T20 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.