India vs West Indies, 4th T20I Live Update : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानावर उतरला आहे. मालिकेत भारताकडे सध्या २-१ अशी आघाडी आहे. अमेरिकेतील प्रेक्षकांपुढे अखेरचे दोन सामने खेळले जाणार असून, या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर कसा खेळतो, याकडेही लक्ष असेल. वर्ल्ड कप संघात श्रेयसला स्थान मिळणे कठीण होत चालले आहे. दीपक हुडाने मात्र संधीचा पुरेपूर लाभ घेतला. त्यामुळे मधल्या फळीत श्रेयसला स्थान मिळेलच याची खात्री नाही. दरम्यान, खराब वातावरणामुळे नाणेफेकीला विलंब झाला आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोर्चबांधणीच्या दृष्टीने या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आजचा सामना ८.४५ ला सुरू होणार असून ८.१५ वाजता नाणेफेक झाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवी बिश्नोई, अक्षर पटेल व संजू सॅमसन हे आज प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळणार आहेत, तर हार्दिक पांड्या, आर अश्विन व श्रेयस अय्यर यांना विश्रांती दिली गेली आहे.
Web Title: IND vs WI, 4th T20I Live Update : west indies won toss, Sanju Samson, Axar Patel and Ravi Bishnoi replaces Hardik Pandya, Shreyas Iyer and Ravi Ashwin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.