फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज दोन्हीही संघ मैदानात आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पण, सूर्यकुमार यादवने सावध खेळी करून भारतीय चाहत्यांना जागे केले. डावाच्या अखेरच्या षटकात देखील पावसाचे आगमन झाले. विसाव्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर काही वेळ खेळ थांबवण्यात आला. खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर अक्षर (१३) पटेलच्या रूपात भारताला आणखी एक झटका बसला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर मुकेश कुमारने एक चौकार ठोकून भारताची धावसंख्या १६५ वर पोहचवली. त्यामुळे विडिंजला मालिका खिशात घालण्यासाठी १६६ धावांची गरज आहे. भारताने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या.
भारताकडून सूर्यकुमार यादव (६१) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९), तिलक वर्मा (२७), संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) आणि अर्शदीप सिंगने (८) धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर अकील हौसेन (२) आणि जेसन होल्डर (२) आणि रॉस्टन चेस यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
तत्पुर्वी, हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले. नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने भारतीय गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले. शनिवारी इतर गोलंदाज अयशस्वी होत असताना अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली. याबद्दल बोलताना हार्दिकने म्हटले, "होय, नक्कीच अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली. त्याने चौथ्या सामन्यात तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय इतर गोलंदाजांनी देखील चांगले आव्हान दिले."
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.