फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक सामन्यात पावसाच्या बॅटिंगमुळे खेळ तूर्तास थांबवण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची गाडी पटरीवरून घसरली. मागच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारे दोन्हीही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. पण, सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला अन् भारताच्या मालिका जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या. १५.५ षटकांपर्यंतचा खेळ झाला असून भारताने ४ गडी गमावून १२१ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार हार्दिक पांड्या (८) आणि सूर्यकुमार यादव (५३) धावांवर खेळपट्टीवर टिकून आहेत.
आज पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करण्याच्या इराद्यात असलेल्या यशस्वीला केवळ ५ धावांवर तंबूत परतावे लागले. अकिल होसैनने आपल्या पहिल्या षटकात संघाला एक बळी मिळवून दिला. लक्षणीय बाब म्हणजे अकिल होसैनने आपल्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला दुसरा झटका दिला. गिल ९ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला. तर, तिलक वर्मा (२७) साजेशी खेळी करून बाद झाला तर संजू सॅमसन (१३) रॉस्टन चेसचा शिकार झाला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -
रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.
Web Title: IND vs WI 5th T20 Live Updates Play stopped due to rain Hardik Pandya and Suryakumar Yadav remain on the field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.