Join us  

IND VS WI: ... अन् त्या सामन्यात हुकले होते पृथ्वी शॉचे शतक

पृथ्वी शॉ याने रणजी आणि दुलीप करंड स्पर्धेतही पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 6:34 PM

Open in App
ठळक मुद्देपृथ्वीचे एक शतक हुकल्याची आठवण आयसीसीला झाली आहे. आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर तसा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पृथ्वी शॉ याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. यापूर्वी त्याने रणजी आणि दुलीप करंड स्पर्धेतही पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. पण त्याचे एक शतक हुकल्याची आठवण आयसीसीला झाली आहे. आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर तसा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

युवा विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व पृथ्वीकडे सोपवण्यात आले होते. या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पृथ्वीने दमदार खेळी साकारली होती. पण यावेळी त्याचे शतक सहा धावांनी हुकले होते.

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया