हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला हैदराबाद येथे आजपासून सुरुवात झाली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांत बदल जाणवले. भारतीय संघात शार्दूल ठाकूरचे कसोटी पदार्पण झाले. भारताकडून कसोटी खेळणारा तो तो २९४ वा खेळाडू आहे. त्याच्या प्रवेशासाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.
२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते त्याला कसोटी कॅप देण्यात आली. या वर्षी जस्प्रीत बुमरा ( दक्षिण आफ्रिका), रिषभ पंत ( इंग्लंड) , हनुमा विहारी ( इंग्लंड) आणि पृथ्वी ( वेस्ट इंडिज) यांनीही कसोटीत पदार्पण केले.
भारताने सलग तीन कसोटीत नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. सलग तीन कसोटीत तीन खेळाडू पदार्पण करण्याची ही २०१३ नंतरची पहिलीच वेळ. याआधी २०१३ मध्ये शिखर धवन ( ऑस्ट्रेलिया) , अजिंक्य रहाणे ( ऑस्ट्रेलिया) आणि मोहम्मद शमी ( वेस्ट इंडिज ) यांनी सलग तीन सामन्यांत पदार्पण केले होते.
Web Title: IND vs WI: Five years later this coincidence; Then 'she' three and now 'only' team india kasoti matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.