India vs West Indies : बीसीसीआयनं बुधवारी आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं १८ खेळाडूंची निवड केली आहे. ६ फेब्रुवारीपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. युवा फिरकीपटू रवी बिश्नोई, जलदगती गोलंदाज हर्षल पटेल आणि अष्टपैलू दीपक हुडा यांची या संघात निवड केली गेली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मालिकेत कुलदीप यादवचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे.
पण, वन डे व ट्वेंटी-२० संघांत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही नावं नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ''जसप्रीत व शमी यांना विश्रांती दिली गेली आहे. जडेजा अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती. लोकेश राहुलही दुसऱ्या वन डे पासून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे,''असे बीसीसीआयनं सांगितले. आर अश्विनबाबत बीसीसीआयनं अपडेट्स दिले नसले तरी TOIच्या वृत्तानुसार फिरकीपटू दुखापतग्रस्त आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
वेस्ट इंडिजचा वन डे संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), फॅबियन एलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार्ह ब्रुक्स, जेसन होल्डर, शे होप, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारिओ शेफर्ड, ओदीन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर .