लॉडरहील- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिल्या ४ पैकी तीन सामने जिंकून आधीच विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचं नेतृत्व आज हार्दिक पांड्या करत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये चार मोठे बदल करण्यात आले असून, कर्णधार रोहित शर्मा याच्यासह रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघ - इशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडिज - एस. ब्रुक्स, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (कर्णधार), आर. पॉवेल, डी. थॉमस, ओ. स्मिथ, जेसन होल्डर, के. पॉल, डी ड्रेक्स, ओ. मॅककॉय, एच. वॉल्श