Join us

IND vs WI : टी-२० सह वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'वर राहिला नाही भरवसा

ही युवा बॅटर संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:36 IST

Open in App

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीनं वेस्ट इंडिज विरुद्ध घरच्या मैदानातील वनडे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ १५ डिसेंबरपासून टी- २० सामन्याने या मालिकेला सुरुवात होणार आहे. 

स्मृती-जेमिमासह काही जणी दोन्ही संघात तर काही जणींना फक्त टी-२० संघात मिळाली संधी 

कर्णधार हरमनप्रीत कौरसह उप कर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष, उमा छेत्री, तितास साधु, दीप्ति शर्मा, साइमा ठाकोर, रेणुका सिंह ठाकुर, मिन्नू मणि आणि प्रिया मिश्रा यांना टी-२० सह वनडे संघातही स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे नंदिनी कश्यप, संजना सजीवन, राघवी बिष्ट आणि राधा यादव या फक्त टी-२० संघाचा भाग आहेत. 

श्रेयंका, प्रिया दुखापतीमुळे आउट, लेडी सेहवागचा बॅड पॅचमुळे पुन्हा 'आउट'

यास्तिका भाटिया, श्रेयंका पाटील आणि प्रिया पुनिया दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर आहेत. याशिवाय खराब फॉर्ममुळे शफाली वर्मा संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे. शफाली आपल्या स्फोटक अंदाजीतील फटकेबाजीसाठी ओळखली जाते. तिला लेडी सेहवागची उपमाही देण्यात येते. पण सध्या ही युवा बॅटर संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडताना दिसते. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ 

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उप कॅप्टन), नंदिनी कश्यप, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, संजना सजीवन, राघवी बिष्ट, रेणुका सिंह ठाकुर, प्रिया मिश्रा, तितास साधु, साइमा ठाकोर, मीनू मणि, राधा यादव. 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघ 

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उप-कॅप्टन), प्रतिका रावल, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मीनू मणि, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधु, साइमा ठाकोर, रेणुका सिंह ठाकुर.

कोणत्या मैदानात रंगणार सामने?

भारत-वेस्टइंडिज महिला संघातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्व सामने मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. याशिवाय वनडे मालिकेतील तिन्ही सामने हे बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर नियोजित आहेत. 

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक

  •  पहिला टी २० सामना : रविवारी, १५ डिसेंबर २०२४
  •  दुसरा टी २० सामना: मंगळवारी,  १७ डिसेंबर २०२४
  •  तिसरा टी २० सामना: गुरुवारी, १९ डिसेंबर  २०२४

(सर्व टी-२० सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होतील.)

  •  पहिला वनडे सामना: रविवारी, २२ डिसेंबर २०२४
  •  दुसरा वनडे सामना: मंगळवारी,  २४ डिसेंबर २०२४
  •  तिसरा वनडे सामना: शुक्रवारी, २७ डिसेंबर २०२४

(सर्व वनडे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील.)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेटभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज