दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज ६ बाद ९४; अजूनही ५५५ धावांनी पिछाडीवर
वेस्ट इंडिजला सहावा धक्का
वेस्ट इंडिजचा अर्धा संघ ४९ धावांत गारद
वेस्ट इंडिजला चौथा धक्का
वेस्ट इंडिजला दुसरा धक्का; शमीने केले पॉवेलला बाद
वेस्ट इंडिजला पहिला धक्का; कर्णधार ब्रेथवेट बाद
रवींद्र जडेजाचे कसोटी क्रिकेटमधले शतक, भारताचा डाव ६४९ धावांवर घोषित
भारताला नववा धक्का, उमेश यादव बाद
भारताच्या सहाशे धावा पूर्ण
रवींद्र जडेजाचे अर्धशतक पूर्ण
कुलदीप यादव 12 धावा काढून बाद
भारताला सातवा धक्का, रविचंद्रन अश्विन माघारी
कर्णधार विराट कोहली 139 धावा काढून बाद, भारताला सहावा धक्का
उपाहारापर्यंत भारताच्या 5 बाद 506 धावा, विराट कोहली 120 आणि जडेजा 19 धावांवर नाबाद
भारताच्या पाचशे धावा पूर्ण, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा मैदानात
रिषभ पंतचे शतक हुकले, भारताला पाचवा धक्का
विराट कोहलीने फटकावले 24 वे कसोटी शतक
विराट कोहली आणि रिषभ पंतने पाचव्या विकेटसाठी केली शतकी भागीदारीरिषभ पंतचे अर्धशतक, खणखणीत षटकार ठोकून पूर्ण केले अर्धशतक
कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच 400 धावांचा टप्पा ओलांडला
राजकोट - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉचे शतक आणि चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 4 बाद 364 धावा उभारल्या होत्या. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात मोठी धावसंख्या उभारून कसोटीवरील पकड भक्कम करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.