भारताचा १० विकेट्स राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
पृथ्वी शॉला १२ धावांवर असताना जीवदान
उमेश यादवचे सामन्यात १० बळी
वेस्ट इंडिज 127 धावांत all out
वेस्ट इंडिजला नववा धक्का; अश्विनने मिळवला बळी
भारताला मोठा दिलासा, सुनील अम्बरीस बाद
वेस्ट इंडिजला सातवा धक्का, जडेजाने केले होल्डरला बाद
कुलदीपच्या गोलंदाजीवर पंतकडून सुनील अम्बरिसला ३७ धावांवर जीवदान
- चहापानापर्यंत विंडीजच्या ६ बाद ७६ धावा, विंडीजकडे २० धावांची आघाडी, उमेश यादवचे ३ बळी
- वेस्ट इंडिजला सहावा धक्का, शॉन डॉर्विच बाद
- रॉस्टन चेस ६ धावांवर बाद, विंडीजची पाचवी विकेट
- विंडीजला चौथा धक्का, शाई होप २८ धावांवर माघारी
- विंडीजची तिसरी विकेट, हेटमायर १७ धावांवर बाद
- विंडिजला दुसरा धक्का, किरॉन पॉवेल शून्यावर बाद
- विंडिजला पहिल्याच षटकात पहिला धक्का, उमेश यादवने घेतली ब्रेथवेटची विकेट
भारताचा पहिला डाव ३६७ धावांवर आटोपला, जेसन होल्डरचे पाच बळी
हैदराबाद - पहिल्या डावात मोठी आघाडी इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी जबरदस्त दणका दिला. जेसन होल्डर, शेनॉन गॅब्रिएल आणि वरिकन यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजी ढेपाळल्याने भारताचा पहिला डाव 367 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 56 धावांची आघाडी घेता आली. भारताकडून पृथ्वी शॉने 70, विराट कोहलीने 45, अजिंक्य रहाणेने 80, रिषभ पंतने 92 आणि रविचंद्नन अश्विनने 35 धावांचे योगदान दिले. तर वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 5, गॅब्रिएलने 3 आणि वरिकनने 2 विकेट्स टिपले.
- रविचंद्रन अश्विन ३५ धावांवर बाद, भारताचा डाव ३६७ धावांवर आटोपला
- भारताच्या ३५० धावा पूर्ण, शेवटची जोडी मैदानात
- उमेश यादव माघारी, भारताची नववी विकेट
- कुलदीप यादव बाद, भारताची आठवी विकेट
- रिषभ पंतचे शतक पुन्हा हुकले, ९२ धावांवर परतला माघारी
- भारताला सहावा धक्का, रवींद्र जडेजा शून्यावर बाद
- भारताला पाचवा धक्का, अजिंक्य रहाणे ८० धावांवर बाद
हैदराबाद - भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन पाहुण्या संघावर वर्चस्व मिळवण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर आहे.
Web Title: IND vs WI LIVE: India's goal of taking the lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.