राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघानेवेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला.
तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने पाहुण्या वेस्ट इंडिजचे 8 फलंदाज 185 धावांवर माघारी पाठवले आहेत. चहापानानंतर त्यांचा नववा फलंदाजही बाद झाला.
वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावातही दैना उडाली. त्यांचे 6 फलंदाज अवघ्या 151 धावांवर माघारी परतले. भारताच्या कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात सावध खेळ करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला दुसरा धक्का बसला. शिम्रोन हेटमेयरही बाद झाला त्यापाठोपाठ सुनील अब्रीसही भोपळ्यावर माघारी फिरला.
पहिल्या डावातील हाराकिरीनंतर वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावातही पडझड सुरु आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी धडपडत असलेल्या विंडीज संघाला तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत एक धक्का बसला आहे. उपहारापर्यंत त्यांची 1 बाद 33 अशी अवस्था झाली आहे.
भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात 9 बाद 641 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजहा पल्ला गाठता आला नाही. रोस्टन चेस (53) आणि किमो पॉल (47) यांनी वेस्ट इंडिजचा संघर्ष तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्याच प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. आर. अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ 468 धावांनी पिछाडीवर आहे.
आर. अश्विनला आणखी एक बळी. विंडीजची अवस्था 9 बाद 159 धावा
अर्धशतकी खेळी करणारा रोस्टन चेस (53) चा अश्विनने त्रिफळा उडवला.
वेस्ट इंडिजला सातवा धक्का
वेस्ट इंडिजच्या 100 धावा पूर्ण
राजकोट - दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव झटपट गुंडाळून पाहुण्यांना फॉलोऑन खेळण्यास भाग पाडण्याचे भारताचे लक्ष्य असेल.
Web Title: IND VS WI LIVE: Team India is on Front foot in 1st Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.