राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघानेवेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला.
भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिल्या डावात 9 बाद 641 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजहा पल्ला गाठता आला नाही. रोस्टन चेस (53) आणि किमो पॉल (47) यांनी वेस्ट इंडिजचा संघर्ष तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्याच प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. आर. अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ 468 धावांनी पिछाडीवर आहे.
आर. अश्विनला आणखी एक बळी. विंडीजची अवस्था 9 बाद 159 धावा
अर्धशतकी खेळी करणारा रोस्टन चेस (53) चा अश्विनने त्रिफळा उडवला.
वेस्ट इंडिजला सातवा धक्का
वेस्ट इंडिजच्या 100 धावा पूर्ण
राजकोट - दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव झटपट गुंडाळून पाहुण्यांना फॉलोऑन खेळण्यास भाग पाडण्याचे भारताचे लक्ष्य असेल.