India vs West Indies ODI Series: कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. (IND vs WI) मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाईल. वन डे वर्ल्डकप च्या तयारीच्या दृष्टीने रोहित शर्माच्या टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, पात्रता फेरीत गेलेला मान परत मिळवण्यासाठी विंडिजही कंबर कसून तयार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी दोनही देशांनी आपले तगडे संघ उतरवले असून वन डे संघात स्फोटक फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडू गेल्या 2 वर्षांपासून एकदिवसीय संघाचा भाग बनू शकला नव्हता. पण आता त्याला संधी मिळाली आहे.
या खेळाडूची संघात 2 वर्षांनंतर एन्ट्री
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात डॅशिंग फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या नावाचा समावेश आहे. शिमरॉन हेटमायरचे २ वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वे येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीत हेटमायर संघाचा भाग नव्हता. वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अपात्र ठरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दमदार कामगिरी
शिमरॉन हेटमायरचा टीम इंडियाविरुद्ध वन डे सामन्यातील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत तो या वनडे मालिकेत टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. शिमरॉन हेटमायरने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 45 पेक्षा जास्तीच्या सरासरीने 500 धावा केल्या आहेत. त्याने भारताविरुद्ध 2 शतके झळकावली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिले दोन वनडे 27 आणि 29 जुलै रोजी बार्बाडोस येथे खेळवले जातील. त्याच वेळी, तिसरा आणि शेवटचा सामना 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदादमध्ये होणार आहे.
वेस्ट इंडिजचा १५ खेळाडूंचा संघ- शाय होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिनक्लॉमायर, ओशेन थॉमस.
भारताचा १५ खेळाडूंचा संघ-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या(उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार
Web Title: IND vs WI ODI Series Explosive Shimron Hetmyer back in west indies odi squad after 2 years against Rohit Sharma led Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.