भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला उतरणार आहेत. अशा स्थितीत जाणून घ्या, वनडे मालिकेत रोहित ब्रिगेडची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते.
सलामीला रोहित-धवनची जोडी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत केएल राहुल आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली होती. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे.
केएल राहुल पाचव्या क्रमांकावर
श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आणि उपकर्णधार केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो तर, यष्टीरक्षक ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यकुमार यादव मधल्या फळीसाठी प्रमुख दावेदार मानला जातोय, पण अय्यर दीर्घकाळापासून संघाशी जोडला गेलेला असल्याने रोहित शर्मा अय्यरवरच विश्वास दाखवू शकतो.
आठव्या क्रमांकावर शार्दुल
सातव्या क्रमांकावर दीपक चहर आणि आठव्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर असू शकतो. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या फलंदाजीच्या कौशल्याचा नमुना सादर केला होता. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णा तिसरा गोलंदाज ठरू शकतो. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रणभव कृष्णा आणि आवेश खान.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला वनडे - 6 फेब्रुवारी (अहमदाबाद).
- दुसरा वनडे - 9 फेब्रुवारी (अहमदाबाद).
- तिसरी वनडे - 12 फेब्रुवारी (अहमदाबाद).
Web Title: IND vs WI ODI Series: Rohit Sharma and Shikhar Dhawan to open in upcoming one day series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.