राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईच्या पृथ्वी शॉने क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचे कधी टेंशन घेतले नाही... किंवा टेंशन असते म्हणूनच तो आणखी जोमाने खेळ करतो... याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याना भारताच्या वरिष्ठ संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीच सोनं केलं. त्याने शतकी खेळी साकारलीच, परंतु त्याचबरोबर अनेक दिग्गजांना विक्रमाच्या बाबतितही मागे टाकले. त्याने यापूर्वी त्याने दुलीप आणि रणजी करंडक स्पर्धेत पदार्पणातच शतक झळकावले होते. त्यामुळे कसोटीतील शतकानंतर 'ये पृथ्वी का स्टाइल है'... अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
पृथ्वीने रणजी करंडक स्पर्धेत तामिळनाडू विरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पदार्पणातच शतकी खेळी साकारली होती. त्यानंतर 2017 मध्ये दुलीप चषक स्पर्धेतही त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. दुलिप, रणजी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी हा पहिलाच खेळाडू आहे.
प्रथम श्रेणी आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करणारा पृथ्वी जगातील तिसराच खेळाडू. यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ आणि डर्क वेलहॅम यांनी अशी कामगिरी केली आहे. पृथ्वी ने राजकोटवरच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यात शतकी खेळी केली होती. त्याने कसोटीतही याच मैदानावर पदार्पण करताना शतक झळकावले.
Web Title: IND VS WI: 'This is prithvi shaw style'... after ranji and duleep trophy he smash century in test debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.