Join us  

IND VS WI : पदार्पणातच सामनावीर ठरलेल्या पृथ्वीने नोंदवला विक्रम

IND VS WI: भारताने शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 4:10 PM

Open in App

राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 134 धावांची धमाकेदार खेळी केली होती. पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकून पृथ्वीने आणखी एक विक्रम नावावर केला. 

सामन्यानंतर तो म्हणाला,''या विजयाने नक्कीच आनंद झाला आहे. पदार्पणात चांगली खेळी केली आणि संघही जिंकला, यापेक्षा आणखी काय हवंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आव्हानांनी भरलेले असते. त्यामुळे मी नैसर्गिक खेळ करण्यावरच भर दिला.'' 

पृथ्वीने 154 चेंडूंत 19 चौकारांच्या मदतीने 134 धावांची खेळी केली. पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकणारा पृथ्वी हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. याआधी प्रविण अमरे ( 1992), आर पी सिंग ( 2006), आर अश्विन ( 2011), शिखर धवन ( 2013) आणि रोहित शर्मा ( 2013) यांनी पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

सर्वात कमी वयात सामनावीर ठरलेला पृथ्वी हा तिसरा भारतीय खेळाडू. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 17 वर्षे व 107 दिवस) आणि रवी शास्त्री ( 18 वर्षे व 294 दिवस ) अव्वल दोन स्थानावर आहेत. पृथ्वीचे आत्ताचे वय 18 वर्षे व 331 दिवस आहे.  

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज