राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

IND vs WI Series 1st Test : वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराला बाकावर बसवले गेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:06 AM2023-07-04T11:06:02+5:302023-07-04T11:06:28+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI Series 1st Test : Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal? Rahul Dravid puzzled over Pujara replacement  | राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI Series 1st Test : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०२३-२५) टप्प्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून भारताचा WTC मधील प्रवास सुरू होणार आहे. मागच्या दोन्ही पर्वात उप विजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारतीय संघ आता नव्या जोमाने मैदानावर उतरणार आहे. भविष्याचा विचार करून भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देणार आहे, पण याच निर्णयाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची गोची झाली आहे. 


वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराला बाकावर बसवले गेले आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. पण, यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवायचे हा पेच निर्माण झाला आहे. अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या जागी म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज की यशस्वी अशी चुरस रंगलेली आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. 


१२ जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत ऋतुराज व यशस्वी हे दोघंही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी सलामीला कायम राहिल. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी द्रविडला ऋतुराज किंवा यशस्वी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांसोबत आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही फलंदाज सलामीला खेळतात, परंतु टीम इंडियाच्या गरजेनुसार त्यांना तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.   


अशी असेल पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा
शुबमन गिल
यशस्वी जैस्वाल/ऋतुराज गायकवाड
विराट कोहली
अजिंक्य रहाणे 
इशान किशन/केएस भरत ( यष्टीरक्षक) 
रवींद्र जडेजा
आर अश्विन
शार्दूल ठाकूर
मुकेश कुमार/जयदेव उनाडकट
मोहम्मद सिराज 


कसोटी सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून 
पहिले सत्र - ७.३० ते ९.३० 
दुसरे सत्र - १०.१० ते १२.१० 
तिसरे सत्र- १२.३० ते २.३० 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: IND vs WI Series 1st Test : Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal? Rahul Dravid puzzled over Pujara replacement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.