IND Vs WI Series: रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं, जाणून घ्या कोणती

India vs West Indies Series : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:47 PM2022-01-31T13:47:19+5:302022-01-31T13:47:38+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs WI Series: 5 Big Challenges for Rohit Sharma as he starts his captaincy innings in ODI’s & T20’s | IND Vs WI Series: रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं, जाणून घ्या कोणती

IND Vs WI Series: रोहित शर्माच्या खांद्यावर वन डे व ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदासोबत आली '५' मोठी आव्हानं, जाणून घ्या कोणती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies Series : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ  ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ६ फेब्रुवारी टीम इंडिया १००० वा वन डे सामना खेळणार आहे आणि इतके वन डे सामने खेळणारा हा पहिलाच संघ आहे. रोहितच्या खांद्यावल वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासोबत पाच मोठी आव्हानंही आली आहेत.  

पहिलं आव्हान, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध भारताची वन डे मालिकेतील कामगिरी. मागील दोन दशतकांत वेस्ट इंडिजला भारतात वन डे मालिका जिंकता आलेली नाही. त्यांनी २००२-०३मध्ये कार्ल हुपरच्या नेतृत्वाखाली भारतात अखेरची वन डे मालिका जिंकली होती. हा विक्रम कायम राखण्याचे आव्हान रोहितला पेलावे लागणार आहे. नुकतेच लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिकात ०-३ अशी गमावली.  

भारतानं घरच्या मैदानावर मागील सहा मालिका जिंकल्यात
२-१, २०१९-२०
३-१, २०१८-१९
२-१, २०१४-१५
२-१, २०१३-१४
४-१, २०११-१२ 
३-१, २००६-०७  

मधली फळी - दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताची मधळी फळी सपशेल अपयशी ठरलेली साऱ्यांनी पाहिली. मधल्या फळीची समस्या ही भारताला बऱ्याच आधीपासून सतावत आलीय.. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यासाठी झालेल्या निवडीचा फटका भारताला  बसला. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हे चौथ्या क्रमांकासाठी शर्यतीत आहेत, परंतु त्यांना सातत्य राखता आलेले नाही.  


वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे दोन प्रमुख गोलंदाज नाहीत. अशात रोहित शर्माला दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व आवेश खान यांना सोबत घेऊन विंडीजला आव्हान द्यावे लागणार आहे. या सर्वांकडे फारसा अनुभव नसल्यानं रोहितच्या नेतृत्वाकौशल्याचा कस लागणार आहे.  

विजयी संघाची घट्ट घडी बसवण्याचे आव्हानही रोहितसमोर आहे. गरजेशिवाय त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करणे आवडत नाही. त्यामुळे अनुभवी व युवा खेळाडूंची सांगड घालून योग्य संघ मैदानावर उतरवण्याचे आव्हान रोहितसमोर आहे. भारतीय संघ वन डे व ट्वेंटी-२० क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे.   

आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे सर्वात मोठे आव्हान रोहितसमोर आहे. भारताला २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व २०११चा वन डे वर्ल्ड स्पर्धेनंतर एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 

Web Title: IND Vs WI Series: 5 Big Challenges for Rohit Sharma as he starts his captaincy innings in ODI’s & T20’s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.