IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

IND vs WI Series : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:25 PM2023-06-23T15:25:45+5:302023-06-23T15:26:15+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI Series : India’s squads for West Indies Tests and ODI series announced. Ruturaj Gaikwad , Yashasvi Jaiswal is in test squad  | IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; Ajinkya Rahane कडे उपकर्णधारपद, यशस्वी, ऋतुराज यांना संधी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI Series : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ येथे दोन कसोटी, तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. BCCI शुक्रवारी वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. यशस्वी जैस्वालऋतुराज गायकवाड यांच्यासह मुकेश कुमार, नवदीप सैनी यांची कसोटी संघात एन्ट्री झाली आहे. WTC Final मधून भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चेतेश्वर पुजाराला डच्चू दिला गेलाय. वन डे संघात संजू सॅमसन व ऋतुराज परतले आहेत.


भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी ( TEST Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Yashasvi Jaiswal, Ajinkya Rahane (VC), KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, R Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Jaydev Unadkat, Navdeep Saini.) 


भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार ), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार ( India’s ODI Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Sanju Samson (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Shardul Thakur, R Jadeja, Axar Patel, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jaydev Unadkat, Mohd. Siraj, Umran Malik, Mukesh Kumar.) 

 


IND vs WI Schedule
कसोटी मालिका
पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
 
वन डे मालिका
पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 

ट्वेंटी-२० मालिका
पहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)

Web Title: IND vs WI Series : India’s squads for West Indies Tests and ODI series announced. Ruturaj Gaikwad , Yashasvi Jaiswal is in test squad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.