Join us  

IND vs WI : रात्रीचं विमान, नको रे बाबा! भारतीय संघासोबत त्रिनिदाद येथे घडलं असं काही की.... 

IND vs WI Series : भारतीय संघ कसोटी मालिका १-० अशी जिंकून आता ३ सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी बार्बाडोस येथे दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:03 PM

Open in App

IND vs WI Series : भारतीय संघ कसोटी मालिका १-० अशी जिंकून आता ३ सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी बार्बाडोस येथे दाखल झाला आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम तयारी या मालिकेपासून सुरू होणार आहे. २७ जुलैला पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण, त्रिनिदाद येथून बार्बाडोस येथे जाताना भारतीय खेळाडूंच्या वाट्याला नकोसा अनुभव आला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भारतीय संघाचं विमान ११ वाजता उड्डाण करणं अपेक्षित होतं, परंतु खेळाडूंना ४ तास विमातळावर वाट पाहावी लागली. ३ वाजता त्यांच्या विमानानं भरारी घेतली अन् ते पहाटे ५ वाजता बार्बोडोस येथे पोहोचले.  या अनुभवामुळे संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे रात्रीचं विमान नको अशी विनंती बीसीसीआयकडे केली आहे. ''विमानतळावर पोहोचण्यासाठी खेळाडूंनी रात्री ८.४० वाजता हॉटेल सोडलं, परंतु त्यांना विमानतळावर खूप प्रतीक्षा करावी लागली. संघ व्यवस्थापनाने पुढील प्रवासासाठी सकाळचं विमान बुक करण्याची विनंती केली आहे. बीसीसीआयने ही विनंती मान्य केली आहे आणि पुढील योजना तशी केली जाईल,''असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. 

पहाटे उशीरा पोहोचल्यामुळे संघातील काही खेळाडूंनी सराव सत्रातून सुट्टी घेण्याची विनंती संघ व्यवस्थापनाकडे केली. भारतीय संघ २७ व २९ जुलैला बार्बाडोस येथे आणि त्यानंतर १ ऑगस्टला त्रिनिदाद येथे वन डे सामना खेळणार आहे. २९ जुलैला भारताचं रात्रीचं विमान होतं, परंतु आता त्यात बदल केला जाईल. वन डे मालिकेसाठी हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन व उम्रान मलिक हेही बार्बाडोस येथे पोहोचले आहेत. आशिया चषक स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आठवडाभराचा कॅम्प भरवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यानंतर खेळाडू अल्पशा विश्रांतीनंतर बंगळुरू येथील NCA मध्ये दाखल होतील.  

वन डे मालिका

  • पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  • दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  • तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 

 

  • वेस्ट इंडिजचा वनडे संघ - शे होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), एलिख अथानाजे, यानिक करिहा, केसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायक मेयर्स, गुडाकेश मोटी, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर, ओशाने थॉमस.
  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआय
Open in App