IND vs WI Series : भारताचे सर्व खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाले आहेत आणि कालपासून सराव सामन्याला सुरूवात झाली. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली कसोटी १२ जुलैपासून सुरू होत आहे. त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळतील. BCCI ने या दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात अनुभवी चेतेश्वर पुजाराला विश्रांती दिली आहे आणि यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंची निवड केली आहे. कसोटी संघात आपली जागा पक्की करण्याची या युवा खेळाडूंसमोर चांगली संधी आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सराव सामन्यात या खेळाडूंचा खेळ पाहून अंतिम निर्णय घेणार आहे.
विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघात नाही स्थान; विंडीज दौऱ्यासाठी युवा फौज जाहीर
यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा ही नवी जोडी सराव सामन्यात भारताकडून सलामीला आली आणि पहिल्या कसोटीत हिच आक्रमक जोडी ओपनिंगला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर शुबमन गिल याला खेळवण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास रोहित व यशस्वी ही जोडी भारताच्या डावाची सुरूवात करेल हे नक्की. पण, यशस्वीला सलामीच्या जागेसाठी ऋतुराजसारखा तगडा स्पर्धक आहे. विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
कालपासून सुरू झालेल्या सराव सामन्यात यशस्वी व रोहित या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी अर्धशतक झळकावले. राहुल द्रविड कसोटी सामन्यातही याच जोडीसोबत जाण्याची शक्यता बळावली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एका जागेसाठी दोन स्पर्धक आहेत... इशान किशन आणि केएस भरत यांच्यापैकी यष्टींमागे कोण दिसेल ही चर्चा आहे. शिवाय अक्षर पटेल किंवा शार्दूल ठाकूर यांच्यापैकी कोणाला खेळवायचे यावरही तोडगा द्रविडला काढायचा आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
IND vs WI Scheduleकसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)