IND vs WI Series : १५ महिन्यांपूर्वी ज्या अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमधून डच्चू दिला गेला होता, त्याला WTC Final साठी पुन्हा बोलावलं गेलं अन् आता तर आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची उप कर्णधार म्हणून निवड केली गेली. खराब फॉर्ममुळे अजिंक्य संघाबाहेर गेला, परंतु त्याने रणजी करंडक आणि आयपीएलमध्ये आपला खेळ दाखवला. WTC Final मध्येही भारतीयांमध्ये सर्वाधिक धावा त्यानेच केल्या. पण, असे असूनही विंडीज दौऱ्यावरील दोन कसोटींसाठी त्याला उप कर्णधार बनवून संघ व्यवस्थापनाने मोठी संधी गमावली, असे मत महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी व्यक्त केले.
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेकडे उप कर्णधारपद सोपवण्यात ‘काहीही चूक नाही’ असे भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांना वाटते, परंतु BCCIने भविष्यातील कर्णधार तयार करण्याची संधी गमावली असे त्यांना वाटते. रोहित शर्मानंतर भविष्यातील कसोटी कर्णधारपदासाठीची चाचणी या मालिकेतून करता आली असती. एका तरुणाला संधी द्यायला हवी होती, असे गावस्कर यांना वाटते. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना गावस्कर यांनी शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोन खेळाडूंचा रोहितनंतर कर्णधार म्हणून विचार करायला हवा, असे म्हटले आहे.
भारताची WTC 2023-25 हंगामाची सुरूवातवेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून होणार आहे. गावस्कर म्हणाले, “शुबमन गिल आणि दुसरा अक्षर पटेल यांचा भावी कर्णधार म्हणून विचार व्हायला हवा. अक्षरने प्रत्येक सामन्यात अधिक चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्याला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिल्यास तो आणखी विचार करण्याची संधी मिळेल. माझ्या दृष्टीने हे दोन खेळाडू भावी कर्णधारपदाचे उमेदवार आहेत. यांच्याशिवाय कोणी असेल तर मी इशान किशनचे नाव सुचवेन.''
त्याचवेळी गावस्करांना असेही वाटले की रहाणेला उप कर्णधारपद देणे हे एक चांगले पाऊल आहे. तथापि, जर ही जबाबदारी एखाद्या तरुण खेळाडूला दिली गेली असती, तर ते त्याचा भावी कर्णधार म्हणून विचार करचा