IND vs WI Series : भारतीय संघ १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कॅरेबियन बेटावर दाखल झाला आहे. पण, बीसीसीआयला एकाच विमानाचं तिकीट न मिळाल्याने भारतीय खेळाडू वेगवेगळ्या विमानानं कॅरेबियन बेटावर दाखल झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाची एक बॅच अमेरिका-लंडन-नेदरलँड व्हाया कॅरेबियन असा प्रवास करणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे अनुक्रमे पॅरिस व लंडन येथून कॅरेबियन बेटावर दाखल होणार आहेत. पण, हे दोघं कधी तेथे पोहोचतील याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर रोहित व विराट दोघंही आपापल्या कुटुंबियांसोबत सुट्टीवर गेले आहेत. पुढील आठवड्यात ते राष्ट्रीय कर्तव्यावर परतण्याचा अंदाज आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ एक सराव सामनाही खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मधील भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. भारताला सलग दोन पर्वात WTC Final मध्ये अनुक्रमे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ९८ कसोटी सामने झाले आणि त्यात भारताने २२ व विंडीजने ३० सामने जिंकले. २०१९मध्ये दोन्ही संघ शेवटचे समोरासमोर आले होते आणि भारताने २-० असा व्हाईट वॉश दिला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पारडे यंदाही जड मानले जात आहे. पण, भारतीय संघ मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह या दोन प्रमुख जलदगती गोलंदाजांशिवाय या दौऱ्यावर येणार आहे. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली गेलीय.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), अॅलिक अॅथनाझे, जेर्मेन ब्लॅकवूड, एनक्रुमाह बोन्नेर, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशुआ डा सिल्वा, शेनॉन गॅब्रिएल, कावेम हॉज, अकिम जॉर्डन, जैर मॅकएलिस्टर, किर्क मॅकेंझी, मार्क्यूनो मिंड्ली, अँडरसन फिलिप, रेयमन रैफर, केमार रोच, जेडेन सिल्स, जोमेल वॉरिकन.
IND vs WI Scheduleकसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)