नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून वन डे आणि कसोटी मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. संघात अनेक बदल करण्यात आले आहेत, मात्र काही खेळाडू अद्याप प्रतीक्षेतच आहेत. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे सर्फराज खान. मुंबईच्या खेळाडूला सातत्याने वगळल्याने माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सर्फराज खानची गणना केली जाते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले असून १३ शतके आणि ९ अर्धशतकांच्या जोरावर ३५०५ धावा केल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२० मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना मुंबईविरुद्धच्या सामन्यात सर्फराज खानने नाबाद ३०१ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी केली होती.
देशांतर्गत क्रिकेटमधील भारताचा 'डॉन ब्रॅडमन'दमदार फलंदाजी आणि मोठी खेळी खेळण्याची क्षमता यामुळे सर्फराजला भारताच्या देशांतर्गत क्रिकेटचा 'डॉन ब्रॅडमन' असेही संबोधले जाते. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रत्येक गोलंदाजासाठी तो काळ ठरला आहे. त्याने अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.
सर्फराज खानची शानदार कामगिरी
हंगाम | डाव | धावा | सरासरी |
२०१९/२० | ९ | ९२८ | १५४.६ |
२०२०/२१ | ९ | ९८२ | १२२.७ |
२०२२ | ९ | ५६६ | ९२+ |
एकूण | ५४ | ३५०५ | ७९.६५ |
सर्फराजसाठी गावस्करांंची बॅटिंग"सर्फराज खान मागील तीन हंगामात १०० च्या सरासरीने धावा करत आहे. संघात निवड होण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल, पण तुम्ही त्याला संघा तरी घ्या. त्याला कळू द्या की त्याच्या कामगिरीची दखल घेतली जात आहे. अन्यथा रणजी करंडक खेळणे बंद करा. फक्त आयपीएलमध्ये खेळेल त्याला संधी द्यायची असेल तर हेच करा", अशा शब्दांत सुनिल गावस्करांनी बीसीसीआयसह निवडकर्त्यांना सुनावले.