कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांनी विजय मिळवला. मात्र, 110 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला घाम गाळावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. दिनेश कार्तिकने उपयुक्त खेळी करताना भारताला 5 विकेट राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यात २१ वर्षीय विंडीज गोलंदाज ओशाने थॉमसने भारतीय फलंदाजांना चांगलेच हैराण केले. थॉमसने रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी व अव्वल फलंदाजांना बाद केले. त्याचा मारा इतका वेगवान होता, की तो समजणे या फलंदाजांना अवघड जात होते. या सामन्यात सर्वात जलद चेंडू टाकण्याचा पराक्रमही थॉमसने केला.
त्याच्या या जलद माऱ्यावर भाष्य करताना भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने एक ट्विट केले. त्यात त्याने १४० पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणाऱ्या ओशाने थॉमसला शिक्षा द्या अशी गमतीने मागणी केली आहे.
Web Title: IND vs WI T20: Punishment from West Indian bowler Thomas, why is Aakash Chopra demanded?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.