West Indies Squad For T20 Series : भारताविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडिया सध्या विंडिज दौऱ्यावर असून ३ ऑगस्टपासून पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ असणार आहे. आगामी मालिकेसाठी यजमान संघात काही नव्या चेहऱ्यांची एन्ट्री झाली आहे. मोठ्या कालावधीनंतर यष्टीरक्षक शाई होप आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. तर, निकोलस पूरन आणि जेसन होल्डर हे देखील टीम इंडियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेसाठी मजबूत संघ निवडला आहे. या संघात ट्वेंटी-२० फॉरमॅटचे अनेक स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. निकोलस पूरन, सलामीवीर काइल मेयर्स आणि जॉन्सन चार्ल्स, मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेटमायर, अष्टपैलू जेसन होल्डर आणि अलीकडेच ४० चेंडूत शतक झळकावणारा रोशटन चेस हा देखील हार्दिकसेनेविरोधात मैदानात असणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघाची निवड करण्यात आली असल्याचे वेस्ट इंडिजच्या मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमा.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -इशान किशन, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक - पहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)