IND vs WI T20I Series : वन डे मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० मालिकेत वेस्ट इंडिजला नमवण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आदी खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. अशात प्लेइंग इलेव्हनची बांधणी करण्याचं आव्हान रोहितसमोर असणार आहे. पण, मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी टीम इंडियाला धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) अजूनही तंदुरुस्त झाला नसल्याने विंडीजमध्ये दाखल झालेला नाही आणि त्याची ही मालिका खेळण्याची शक्यता कमीच होत चालली आहे. त्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हाही ट्वेंटी-२० मालिकेला मुकण्याची चिन्हे दिसत आहेत.
वन डे मालिकेसाठीच्या संघाचा सदस्य असलेल्या जडेजाला पहिल्या सामन्याआधी गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा त्रास दिला. त्यामुळे तो पहिल्या दोन वन डे सामन्यांत खेळणार नसल्याचे BCCI ने जाहीर केले होते. पण, प्रत्यक्षात तो तिसऱ्या वन डेतही नाही खेळला. BCCI ने रवींद्र जडेजा १०० टक्के तंदुरुस्त नसल्याचे सांगितले आणि वैद्यकिय टीम लक्ष ठेऊन आहे. अशात त्याचे पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळणेही निश्चित नसल्याचे संकेत आहेत.
भारताचा टी२० संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
crमीcrcट्वेंटी-२० मालिका-
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)