India vs West Indies T20I Series : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना तीन तासांनी सुरू होणार आहे आणि भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने या मालिकेतून माघार घेतली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी गेलेल्या लोकेश राहुलला कॅरेबियन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तो अन्य खेळाडूंसह कॅरेबियन दौऱ्यावर प्रवास करू शकला नाही. BCCI ने दिलेल्या अपडेट्सनुसार तो वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच होती आणि तसेच झाले. त्याच्या जागी संघात IPL मध्ये १५८ षटकार खेचणाऱ्या फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. BCCI ने थोड्याचवेळा पूर्वी ही घोषणा केली.
लोकेश राहुलला यंदाच्या वर्षात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानावर ३, श्रीलंकेविरुद्धच्या ३, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५, आयर्लंडविरुद्धच्या २ व इंग्लंडविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत मुकावे लागले होते. त्यात आता विंडीज दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या मालिकेची भर पडली आहे. निवड समितीने त्याच्या जागी संघात संजू सॅमसन ( Sanju Samson) ची निवड केली आहे. आधी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० संघात संजूचा समावेश नव्हता, परंतु लोकेशच्या माघारीमुळे हा निर्णय घेतला गेला. नुकत्याच पार पडलेल्या वन डे मालिकेत संजू संघाचा सदस्य होता.
वेस्ट इंडिजचा संघ - निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शामार्ह ब्रूक, डॉमिनीक ड्रेक, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स , ओबेड मॅककोय, किमो पॉल, रोमारिओ शेफर्ड, ओडिन स्मिथ, डेव्हॉन थॉमस, हेडन ज्युनिअर.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)