India vs West Indies T20I Series Squad : वन डे मालिकेतील पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी वेस्ट इंडिज संघ सज्ज झाला आहे. भारताविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पाच सामान्यांच्या मालिकेसाठी विंडीजने १६ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला. आयपीएलमुळे भारतीय गोलंदाजांची नस ओळखुन असलेल्या फलंदाजाचे संघात पुनरागमन झाले आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वन डे मालिकेत ३-० असा विजय मिळवून इतिहास घडविला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेन्टी-२० मालिकेत कमाल करण्यास सज्ज आहे. पण, यजमानही तयारीत आहेत. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली यजमान टक्कर देण्यास तयार आहेत. १६ सदस्यांपैकी १३ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील. डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर याचे पुनरागमन झाले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ - निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शामार्ह ब्रूक, डॉमिनीक ड्रेक, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स , ओबेड मॅककोय, किमो पॉल, रोमारिओ शेफर्ड, ओडिन स्मिथ, डेव्हॉन थॉमस, हेडन ज्युनिअर.
भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
ट्वेंटी-२० मालिका-
- २९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
- १ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
- २ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
- ६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
- ७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)