Join us  

IND vs WI Tests: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज

IND vs WI Tests: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने १८ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 9:05 AM

Open in App

IND vs WI Tests: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने १८ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने सराव शिबिर आयोजित केले आहे आणि त्यासाठी हे १८ सदस्य निवडले गेले आहेत. विंडीजचे काही स्टार खेळाडू वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी झिम्बाब्वेत असल्यामुळे त्यांचे नाव या कसोटी संघात दिसत नाही. यामध्ये जेसन होल्डर व निकोलस पूरन या खेळाडूंचा समावेश आहे.  

९ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी झिम्बाब्वेत असणार आहे. होल्डर व पूरन यांच्यासह रोस्टन चेस, कायले मेयर्स व अल्झारी जोसेफ हेही त्या संघासोबत आहेत. पण पहिल्या कसोटीसाठी ते उपलब्ध होण्याचा विश्वास क्रिकेट वेस्ट इंडिजकडून व्यक्त केला जातोय. वेस्ट इंडिजचा संघ सुपर सिक्समधील त्यांचा शेवटचा साखळी सामना ७ जुलैला खेळणार आहेत आणि फायनल ९ जुलैला होणार आहे. हरारे ते डॉमिनिका प्रवासासाठी मर्यादित विमानसेवा असल्याने या खेळाडूंचे पहिल्या कसोटीसाठी वेळेत येणे अवघड आहे. त्यामुळेच विंडीजने १८ सदस्यीय संघ निवडला आहे.  

या १८ खेळाडूंमध्ये कसोटी स्पेशालिस्ट क्रेग ब्रेथवेट आणि तागेनरीन चंद्रपॉल यांच्यासह जोश डा सिल्वा व केमार रोच यांचा समावेश आहे. शेनॉन गॅब्रिएल, अँडरसन फिलिप, रहकिम कोर्नवॉल, जेडन सिल्स व एनक्रुमाह बोन्नेर यांचाही यात समावेश आहे. कावेम हॉज, अॅलिक अॅथनाझे व जैर मॅसएलिस्टर या युवा खेळाडूंचीही निवड केली गेली आहे. ३० जूनपासून त्यांचा सराव शिबीर होणार आहे. त्यानंतर ९ जुलैला संघ डॉमिनिकासाठी प्रवास करेल.  

वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), अॅलिक अॅथनाझे, जेर्मेन ब्लॅकवूड, एनक्रुमाह बोन्नेर, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशुआ डा सिल्वा, शेनॉन गॅब्रिएल, कावेम हॉज, अकिम जॉर्डन, जैर मॅकएलिस्टर, किर्क मॅकेंझी, मार्क्यूनो मिंड्ली, अँडरसन फिलिप, रेयमन रैफर, केमार रोच, जेडेन सिल्स, जोमेल वॉरिकन.  

तेगनरीन चंद्रपॉलचा विक्रम विंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनरीनचे ने द्विशतकीय खेळी केली होती. त्याच्या या शतकाने कसोटीत द्विशतक झळकावणारी ही क्रिकेट इतिहासातील दुसरी पिता-पुत्राची जोडी ठरली. याआधी पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मद व शोएब मोहम्मद यांनी द्विशतकी खेळी केली होती. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिजजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App