राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीने संघातील प्रत्येक खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले, परंतु दणदणीत विजय मिळवूनही तो नाराज दिसला. त्याने ती नाराजी बोलूनही दाखवली.
भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोहली म्हणाला,'' इंग्लंड आणि भारत येथील वातावरणाशी तुलना होऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये खेळणे मोठे आव्हानात्मक होतो आणि भारतातील खेळपट्टींवर आम्ही वर्चस्व गाजवतो. वेस्ट इंडिजच्या संघाबाबत मी काही भाष्य करणार नाही, परंतु मला आशा आहे की ते त्यांच्या खेळाचा अभ्यास करतील."
पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ आणि कसोटी सामन्यात पहिले शतक करणाऱ्या रवींद्र जडेजा यांचेही कोहलीने कौतुक केले. ''पृथ्वी आणि जडेजा यांच्या कामगिरीवर खूश आहे. या दोघांनी दमदार कामगिरी केली. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली.''
खेळाडूंचे कौतुक करून झाल्यानंतर मात्र कोहलीने एका नियमावर बोट ठेवताना नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,'' नव्या नियमानुसार 45 मिनिटे पाणी पिण्यास बंदी आहे. अशा वातावरणात 45 मिनिटे पाणी न पिता फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे आशा करतो की भविष्यात या नियमावर विचार केला जाईल."
Web Title: IND VS WI: Virat Kohli gets unhappy even after winning?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.