हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघाचे एक स्वप्न दुसऱ्य दिवशीही अधुरेच राहिले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे एक स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाला मात्र एक स्वप्न सत्यात उतरवता आले नाही.
वेस्ट इंडिजच्या डावानंतर भारताची सुरुवात सलामीवीर पृथ्वी शॉ याने झोकात सुरुवात करून दिली.
पृथ्वी खेळत असताना भारतीय संघ आज चारशे धावांचा टप्पाही गाठू शकतो, असे वाटत होते. पण पृथ्वी बाद झाल्यावर मात्र भारताची धावगती मंदावली. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली भागीदारी रचली. पण कोहलीला अर्धशतक झळकावण्यासाठी पाच धावा कमी पडल्या. त्यानंतर अजिंक्य आणि रिषभ पंत यांनी अभेद्य शतकी भागीदारी रचली.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८ अशी मजल मारली आहे. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी आघाडी मिळवेल, असे वाटत होते. पण भारतीय संघ अजूनही तीन धावांनी पिछाडीवर असल्याने त्यांचे आघाडी मिळवण्याचे स्वप्न आज साकार होऊ शकले नाही.